घरअर्थजगतजागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावर, ब्रिटनलाही टाकलं मागे

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावर, ब्रिटनलाही टाकलं मागे

Subscribe

नवी दिल्ली – ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर आता भारताचा क्रमांक लागतो. भारताने ब्रिटनला मागे टाकले असून ब्रिटन सहाव्या क्रमांकावर गेला आहे. ब्रिटनमध्ये सध्या अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. यूकेमध्ये ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) भारताची अर्थव्यवस्था 13.5 टक्के दराने वाढली आहे.

हेही वाचा – प्रत्यक्ष कर संकलनात ३३ टक्क्यांनी वाढ, उद्दीष्ट्यपूर्ती होणार?

- Advertisement -

भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये (IMI) भारत तिमाहीत दुसऱ्या स्थानावर होता. पण चीनच्या मागे होता. एकेकाळी ब्रिटनने भारतावर राज्य केले आहे. १९४७ पर्यंत ब्रिटनने भारतावर अधिराज्य गाजवलं. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकेडवारीनुसार, भारताने आता ब्रिटनला मागे टाकलं आहे.

नव्या पंतप्रधानांसमोर ठाकणार आव्हान

- Advertisement -

ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असतानाच ही मोठी बातमी समोर आली आहे. बोरिस जॉन्सन यांचा उत्तराधिकारी म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांची सोमवारी निवड झाली. परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस हे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना मागे टाकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दशकांपासून यूकेमध्ये महागाई वाढली आहे. या देशावर सध्या मंदीचे संकट आहे. बँक ऑफ इंग्लंडचे म्हणणे आहे की ही परिस्थिती 2024 पर्यंत राहील. अशा परिस्थितीत जो कोणी नवा पंतप्रधान होईल, त्याच्यासमोर अनेक आव्हाने असतील.

हेही वाचा – आर्थिक वर्ष-23 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या GDP मध्ये 13.5 टक्क्यांनी वाढ

केवढी आहे भारताची अर्थव्यवस्था?

IMF ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था मार्च तिमाहीत ८५४ अब्ज डॉलर इतका होता. तर, युकेची अर्थव्यवस्था ८१६ अब्ज डॉलर आहे. ही गणना IMF डेटाबेस आणि ब्लूमबर्ग टर्मिनलचा विनिमय दर वापरून केली गेली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -