घरदेश-विदेशजागतिक दूध उत्पादनात भारत प्रथम स्थानी

जागतिक दूध उत्पादनात भारत प्रथम स्थानी

Subscribe

दूध उत्पादनामध्ये भारत देश जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. जगात उत्पादन करणाऱ्या करण्यामध्ये भारतचा 24 टक्के वाटा असल्याची माहिती समोर आली आहे.

दूध उत्पादनामध्ये भारत देश जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. जगात दूध उत्पादन करण्यामध्ये भारताचा 24 टक्के वाटा असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतीच जगातील दूध उत्पादनाची माहिती समोर आली आहे. यामध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस मध्ये आलेल्या माहितीमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. तसेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडून संसदेच्या सभागृहात सुद्धा ही माहिती देण्यात आली.

भारताला दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमाकांचा बहूमान मिळालेला आहे. पण भारतात मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांकडे सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य म्हणून पाहिले जाते. यामध्ये सुद्धा उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबतची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून याआधी देण्यात आली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्याचा दूध उत्पादन करण्यात क्रमांक लागतो.

- Advertisement -

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत आणखी एक महत्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षात म्हणजेच वर्ष 2014-15 ते वर्ष 2021-22 या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर जागतिक पातळीवर भारताने दूध उत्पादनामध्ये 24 टक्के योगदान दिले आहे. ज्यामुळे भारत देशाला हा बहुमान मिळाला असल्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या सभेत जोरदार राडा, आधी दगडफेक नंतर कार अडवली, नेमकं काय घडलं?

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील याबाबत लोकसभेत बोलण्यात आले आहे. त्यांनी दूध उप्तादन क्षेत्रात खरे नेतृत्व हे महिला करत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे. दुग्ध उत्पादनात महिला 70 टक्के योगदान देत असल्याचेही मोदींकडून सांगण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान हे 24 टक्के आहे. भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव देश आहे असे म्हणता येईल. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगाचे एक आदर्श उदाहरण ठरु शकेल, असेही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -