घर देश-विदेश भारत चंद्रावर पोहचला अन् पाकिस्तानाच्या मदरशातील विद्यार्थी सांगतात, पृथ्वी....; व्हिडीओ व्हायरल

भारत चंद्रावर पोहचला अन् पाकिस्तानाच्या मदरशातील विद्यार्थी सांगतात, पृथ्वी….; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : भारताच्या (India) चांद्रयान – 3 (Chandrayaan 3) मोहीमे यशस्वीपणे चंद्रावर उतरले आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केली आहे. चांद्रयान – 3 च्या यशनंतर जगभरात इस्रोच्या शास्रज्ञांचे कौतुक होत आहे. चांद्रयान मोहिमेचा रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माहिती गोळा करत आहे, मात्र दुसरीकडे पाकिस्तानातील (Pakistan) लोक अजूनही पृथ्वी (Earth) गोल आहे यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. पाकिस्तानातील मदरशात (Madrashat) शिकणाऱ्या विद्यार्थाचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाला आहे. जो पाहिल्यावर  हसू आवरणार नाही. (India reached the moon and the students of the madrasas of Pakistan say Earth Video viral)

हेही वाचा – कर्नाटकहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात थांबला दोन वर्षीय चिमुकलीचा श्वास; ‘ते’ पाच जण बनले देवदूत

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला पत्रकार मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते की, तुम्हाला मदरशांमध्ये विज्ञान, गणित किंवा इंग्रजी शिकवले जाते का? यावर विद्यार्थ्याने उत्तर दिले की, आता मदरशात आम्हाला दुनियाभराचे ज्ञान दिले जाते, जेणेकरून कुठल्याही बाबींमध्ये मागे राहू नये. आम्ही धर्माबरोबर दुनियादारीचे ज्ञान घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पृथ्वी गोल नाही, ती फिरत नाही

- Advertisement -

यानंतर पत्रकाराने जमीन गोल आहे की सपाट? असा प्रश्न विचारला. यावर विद्यार्थ्याने उत्तर दिले की, आला हजरतच्या प्रकाशात सांगितले तर जमीन गोठली आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की ती गोलाकार आहे आणि फिरते आहे. याचपार्श्वभूमीवर महिला पत्रकाराने प्रश्न विचारला की, जमीन सपाट असेल तर ऋतू कसे बदलतात. दिवस आणि रात्र कशी होते? चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कसे होतात? विद्यार्थ्याने उत्तर दिले, जमीन स्थिर आहे. चंद्र तिच्याभोवती फिरतो आणि सूर्य पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. जमीन हलत नसल्यामुळे हवामान थंड आणि गरम होते. दिवस लहान करणे हेदेखील सूर्यामुळेच शक्य होते.

हेही वाचा – नव्या पिढीच्या हाती ‘रिलायन्स’चं नेतृत्व; ईशा-आकाशवर सोपविली मोठी जबाबदारी

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पाकिस्तानी मदरशामधील विद्यार्थ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका यूजरने या पोस्टवर लिहिले की, मी हा व्हिडिओ माझ्या विज्ञान शिक्षकाला पाठवला. त्यांच्याकडून मला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांना हदय विकासाचा झटका आला नसावा. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, सर्व गोष्टी एकत्र करून एक पुस्तक प्रकाशित केले पाहिजे. जेणेकरुन पुढे वाचणाऱ्यांनाही या प्रक्रियेअंतर्गत निरक्षर बनवले जाईल.

- Advertisment -