घरदेश-विदेशभारताला २०२० मध्ये मिळाली ६४ अब्ज डॉलर्सची FDI; जगात पाचव्या स्थानी

भारताला २०२० मध्ये मिळाली ६४ अब्ज डॉलर्सची FDI; जगात पाचव्या स्थानी

Subscribe

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. असे असले तरीही थेट परकीय गुंतवणूकीच्या (FDI) बाबतीत भारताने नवीन स्थान मिळवले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०२० मध्ये ६४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची एफडीआय भारतात आली आणि थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकावर भारताने आपले स्थान निर्माण केले आहे.

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे झालेला उद्रेक हा आर्थिक घडामोडींवर फारच खोलवर होता, मात्र मजबूत मूलतत्त्वे काही ठराविक काळासाठी आशा देत असतात, असे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यापार आणि विकास परिषदेने सोमवारी जाहीर केलेला जागतिक गुंतवणूक अहवाल २०२१ मध्ये असे म्हटले, जागतिक परदेशी गुंतवणूकीचा प्रवाहावर कोरोना महामारीचा वाईट परिणाम झाला आहे. तसेच ही गुंतवणूक २०२० मध्ये ३५ टक्क्यांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या १५०० अब्ज डॉलर्सनी कमी होऊन १००० अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.

- Advertisement -

या अहवालातून पुढे असेही सांगितले गेले की, जगभरातील कोरोना महामारीच्या कारणामुळे लॉकडाऊनमध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणूक प्रकल्पांची गती कमी केली आणि मंदीच्या भीतीपोटी बहुराष्ट्रीय उद्योगांना नवीन प्रकल्पांचे पुन्हा मूल्यांकन करण्यास भाग पाडले आहे. २०१९ मध्ये ५१ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत भारतातील एफडीआय २०२० मध्ये २७ टक्क्यांनी वाढून ६४ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाला, असे अहवालात म्हटले आहे. माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) उद्योगात अधिग्रहण करून भारत जगातील पाचवा क्रमांकाचा एफडीआय प्राप्तकर्ता देश झाला असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

तसेच, या अहवालानुसार निर्यातीशी संबंधित उत्पादन परत रुळावर येण्यास वेळ लागण्याची शक्यता असून जे गुंतवणूकीची प्राथमिकता आहे. परंतु अशी आशा व्यक्त केली जात आहे की, सरकारच्या मदतीमुळे हे काम अधिक सुलभ होणार आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या योजनेमुळे उत्पादन क्षेत्रात पुन्हा गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे.


Yoga Day 2021: १८ हजार फूट उंचावरून ITBP जवानांनी केले सूर्यनमस्कार
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -