घरताज्या घडामोडीधक्कादायक! कोरोनाचा वाढता आलेख, ३ दिवसात १० हजाराने वाढ

धक्कादायक! कोरोनाचा वाढता आलेख, ३ दिवसात १० हजाराने वाढ

Subscribe

कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तीन ३ दिवसात १० हजार कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

देशात विळखा घालणाऱ्या कोरोनाचा आलेख पाहता धडकी भरणारा आहे. कारण तीन दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हिंदुस्तान.कॉमच्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांचा देशात आकडा ५० हजारांवर गेला आहे. विशेष म्हणजे ४ मे रोजी देशात कोरोनाबाधितांची संख्या ४० हजार इतकी होती. तर ६ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारावर गेली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा हा आलेख पाहता तीन दिवसात १० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण

कोरोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये आढळून आले आहेत. तर बुधवारी ३ हजार ४९० नव्या रुग्णांची भर पडली असून ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात ५२ हजार ९६७ कोरोनाबाधित असून १ हजार ७११ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

- Advertisement -

असा वाढत गेला कोरोनाचा आलेख

कोरोनाचा प्रसार आता वेगाने होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी १० हजारची आकडेवारी २० हजार होण्यासाठी १० दिवसांचा कालावधी लागत होता. त्यानंतर २० हजारची आकडेवारी ३० हजार होण्यासाठी ७ दिवसांचा कालावधीत लागला होता. त्यानंतर ३० हजारावरुन ४० हजार होण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला आहे. मात्र, आता ४० हजारवरुन ५० हजार होण्यासाठी केवळ तीन दिवस लागले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

अशी वाढली कोरोनाची संख्या

  • २५ मार्च – ६०५ कोरोनाबाधित, १० जणांचा मृत्यू
  • ३ एप्रिल – २५४७ कोरोनाबाधित, ६२ जणांचा मृत्यू
  • ४ एप्रिल – ३०७२ कोरोनाबाधित, ७५ जणांचा मृत्यू
  • १३ एप्रिल – ९३५२ कोरोनाबाधित, ३२४ जणांचा मृत्यू
  • १४ एप्रिल – १०,८१५ कोरोनाबाधित, ३५३ जणांचा मृत्यू
  • २३ एप्रिल – २१,७०० कोरोनाबाधित, ६८६ जणांचा मृत्यू
  • २४ एप्रिल – २३,४५२ कोरोनाबाधित, ७२३ जणांचा मृत्यू
  • ६ मे – ५२,९९१ कोरोनाबाधित, १,७११ जणांचा मृत्यू

या राज्यात अधिक धोका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -