घरCORONA UPDATEIndia Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या रुग्णसंख्येत वाढ; रिकव्हरी रेट...

India Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या रुग्णसंख्येत वाढ; रिकव्हरी रेट ९७.२८ टक्क्यांवर

Subscribe

दोन दिवसांपूर्वी देशात ११८ दिवसांत सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. पण त्यानंतरपासून पुन्हा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली. आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४१ हजार ८०६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५८१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३९ हजार १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ९ लाख ८७ हजार ८८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ११ हजार ९८९ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १ लाख ४३ हजार ८५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख ३२ हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत देशात ३४ लाख ९७ हजार ५८ जणांचे लसीकरण पार पडले आहे. आतापर्यंत देशात ३९ कोटी १३ लाख ४० हजार ४९१ जणांना लस दिली गेली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

- Advertisement -

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात १४ जुलैपर्यंत ४३ कोटी ८० लाख ११ हजार ९५८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी काल दिवसभरात १९ लाख ४३ हजार ४८८ नमुन्यांच्या चाचण्या केल्या आहेत.

- Advertisement -

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोाबाधितांची संख्या १८ कोटी ९१ लाख ३८ हजार पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४० लाख ७४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७ कोटी २७ लाख ७६ हजारांहून कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – COVID-19: इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाची वाढली चिंता; दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -