घरताज्या घडामोडीदेशभरात २४ तासांत ११ हजार ९२९ नवे रुग्ण; ३११ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशभरात २४ तासांत ११ हजार ९२९ नवे रुग्ण; ३११ कोरोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत देशभरात ११ हजार ९२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ११ हजार ९२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ लाख २० हजार ९२२ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ४९ हजार ३४८ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ६२ हजार ३७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ९ हजार १९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात ३,४२७ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. यापैकी ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात ११३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता एकूण मृतांचा आकडा ३ हजार ८३० इतका झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येला आवर कसा घालायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

एका दिवसात १४ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात एका दिवसात १४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत ४३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात २५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या ९ हजार ३३६ वर पोहोचली आहे. दरम्यान, पुण्याचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यूदरपेक्षा सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू; माहिती लपवण्याचा प्रयत्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -