Corona in India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; 24 तासात 1,68,063 नवे रुग्ण

भारतात गेल्या 24 तासात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 58.08 टक्के नवीन रुग्ण या 5 राज्यांमधून आढळून आली आहेत. याशिवाय एकट्या महाराष्ट्रात 19.92 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

India reports 1,68,063 new corona cases, 277 deaths in the last 24 hours Omicron case tally at 4,461
Corona in India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; 24 तासात 1,68,063 नवे रुग्ण

भारतात कोरोना रुग्णसंख्येत सोमवारच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र आजच्या रुग्णसंख्येमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. कारण सोमवारच्या तुलनेत आज 6.5 टक्के कमी रुग्ण नोंदवण्यात आले. तर कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69,956 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. यात सोमवारी देशात 1.79 लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यामुळे भारतात आतापर्यंत कोरोनाचे 3,58,75,790 रुग्ण आढळले आहेत. तर देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 4,461 वर पोहोचली आहेत.

भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकट्या महाराष्ट्र झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 33,470 नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये 19,286, दिल्लीत 19,166, तामिळनाडूमध्ये 13,990, कर्नाटकमध्ये 11,698 रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतात गेल्या 24 तासात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 58.08 टक्के नवीन रुग्ण या 5 राज्यांमधून आढळून आली आहेत. याशिवाय एकट्या महाराष्ट्रात 19.92 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 277 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीमुळे भारतात आतापर्यंत 4,84,213 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत केरळमध्ये सर्वाधिक (166) मृत्यू झाले आहेत. याशिवाय दिल्लीत 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी देशात 69,959 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 3,45,70,131 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 8,21,446 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांमध्ये 97,827 ची वाढ झाली आहे. त्याचवेळी देशात गेल्या 24 तासांत 92,07,700 नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.तर आत्तापर्यंत देशात 152 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.


coronavirus : सर्दी, खोकल्यास जबाबदार विषाणू करणार कोरोनापासून संरक्षण, संशोधनातून खुलासा