घरCORONA UPDATECorona Update: देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर मृतांचा आकडाही झाला कमी

Corona Update: देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर मृतांचा आकडाही झाला कमी

Subscribe

२६ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३३ कोटी ९० लाख ३९ हजार ८६१ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय.

देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळतेय. तर मृतांचा आकडाही काही अंशी कमी झाला आहे. आज कोरोना रुग्णसंख्येत तब्बल २५ हजारांनी रुग्णसंख्या घटली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ८६ हजार ३६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा आकडा खाली पोहचला आहे. तर तर ३ हजार ६६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या घटणाऱ्या प्रमाणाबरोबरच कोरोना मृतांची संख्याही कमी झाली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत १ लाख ८६ हजार ३६४ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात ३ हजार ६६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाली आहे. देशात आज २ लाख ५९ हजार ५५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९०.३४ टक्के झाले आहे.

- Advertisement -

भारतातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या २ कोटी ७५ लाख ५५ हजार ४५७ झाला आहे. तर देशात २ कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.. आतापर्यंत ३ लाख १८ हजार ८९५ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.देशात सध्या २३ लाख ४३ हजार १५२ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २० कोटी ५७ लाख २० हजार ६६० इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३३ कोटी ९० लाख ३९ हजार ८६१ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २० लाख ७० हजार ५०८ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.


म्युकरमायकोसिसची वाढती रुग्णसंख्या, केंद्राचा ‘इम्फोटेरिसीन बी’ चा जास्त साठा गरजेचा – आरोग्यमंत्री


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -