घरताज्या घडामोडीCorona: देशात २४ तासांत १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू

Corona: देशात २४ तासांत १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत देशात १०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १८ हजार ७११ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर देशात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. खाली गेलेला कोरोनाबाधितांचा आलेख पुन्हा एकदा वरच्या दिशेने जाऊ लागला आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक ठरु लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात १०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १८ हजार ७११ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

१४ हजारहून अधिक जणांची कोरोनावर मात

देशात २४ तासांत १८ हजार ७११ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर १४ हजार ३९२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

आतापर्यंतची एकूण संख्या

देशात आतापर्यंत एकूण १ कोटी १२ लाख १० हजार ७९९ कोरोनाबाधितांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ कोटी ८ लाख ६८ हजार ५२० जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत १ लाख ५७ हजार ७५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात सध्या १ लाख ८४ हजार ५२३ Active केसेस असून देशात आतापर्यंत २ कोटी ९ लाख २२ हजार ३४४ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ३१ मार्चपूर्वी पॅन आधारशी लिंक करा अन्यथा पॅन Inactive होईल


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -