Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी चिंताजनक! गेल्या २४ तासांत २ लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद; तर १,१८५...

चिंताजनक! गेल्या २४ तासांत २ लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद; तर १,१८५ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत देशात तब्बल २ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा उद्रेक होताना दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल २ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा उद्रेक होताना दिसत आहे. देशात दररोज नवे उच्चांक नोंदवले जात आहेत. गेल्या २४ तासांत भारतात २ लाख १६ हजार ८५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही सर्वात विक्रमी नोंद आहे. तर मृत्यूचा आकडा देखील वाढला आहे. देशात गेल्या २४ तासांत १ हजार १८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

२४ तासांत १ हजारहून अधिक जणांचा मृत्यू

भारतात गेल्या २४ तासांत २ लाख १७ हजार ३५३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १ लाख १८ हजार ३०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार १८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात १ कोटी ४२ लाख ९१ हजार ९१७ जणांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २५ लाख ४७ हजार ८६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १५ लाख ६९ हजार ७४३ Active रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १ लाख ७४ हजार ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत भारतात ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ जणांनी लसीकरण केले आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६ लाख ३९ हजार ८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ८७ हजार ४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६ लाख २० हजार ६० Active रुग्ण आहेत.


हेही वाचा – निर्यात बंदीमुळे अडकलेला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करा, मनसेचा केंद्र सरकारला सल्ला


- Advertisement -

 

- Advertisement -