घरताज्या घडामोडीदेशात कोरोनाची स्थिती अति गंभीर, २४ तासांत अडीच लाख नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोनाची स्थिती अति गंभीर, २४ तासांत अडीच लाख नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे.

कोरोनाने देशात अक्षरश: हाहाकार केला आहे. कोरोनाची दुसरी लाट वाऱ्यासारखी पसरत आहे. देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यू देखील मोठ्या संख्येने वाढला आहे. एका दिवसात देशात दीड हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशात कोरोनाची चिंता अधिक वाढली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

१ लाख ३८ हजार ४२३ जणांची कोरोनावर मात

देशांत गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही आकडेवारी अक्षरश: धडकी भरवणारी आहे. तर देशात गेल्या २४ तासांत १ लाख ३८ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशांत आतापर्यंत १ कोटी ४७ लाख ८८ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात १८ लाख १ हजार ३१६ Active केसेस आहेत. तर आतापर्यंत १ कोटी २८ लाख ९ हजार ६४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ७७ हजार १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १२ कोटी २६ लाख २२ हजार ५९० जणांनी लस घेतली आहे.


हेही वाचा – सावधान… बेफिकीरपणा कोरोनाच्या पथ्यावर!

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -