घरCORONA UPDATEIndia Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासांत बाधितांची संख्या घटली; २९,६८९ नवे...

India Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासांत बाधितांची संख्या घटली; २९,६८९ नवे रूग्ण, ४१५ मृत्यू

Subscribe

देशात चार महिन्यांनंतर कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांहून कमी

गेल्या काही दिवसांपासून देशात सध्या दररोज ४० हजारांच्या आसपास नव्या बाधितांची नोंद करण्यात येत होती, मात्र आता हा बाधितांचा आलेख घसरताना दिसत आहे. चार महिन्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कमी कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशी देशात ४० हजारांहून कमी बाधितांची नोंद करण्यात आली असून देशाची चिंता कमी झाल्याचे दिसतेय. सोमवारी देशात ३९ हजार ३६१ इतके नवे बाधित आढळले तर ४१६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती तर कालच्या तुलनेत आज मंगळवारी देशात बाधितांचा आकडा तब्बल ९ हजारांनी घसरला आहे. गेल्या २४ तासात देशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, २९ हजार ६८९ नव्या बाधितांचे निदान करण्यात आले तर ४१५ जणांना आपला जीव दिवसभरात कोरोनामुळे गमवावा लागला आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. देशात गेल्या २४ तासात ४२ हजार ३६३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २९ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले असून ४१५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४२ हजार ३६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २१ हजार ३८२ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ६ लाख २१ हजार ४६९ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ३ लाख ९८ हजार १०० जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २५ जुलैपर्यंत देशभरात ४४ कोटी १९ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. यासह आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४५ कोटी ९१ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १७.२० लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.

- Advertisement -

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -