Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update : दिलासादायक! देशात कोरोना रुग्णसंख्येत काही अंशी घट, तर...

Corona Update : दिलासादायक! देशात कोरोना रुग्णसंख्येत काही अंशी घट, तर २७७१ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले असून देशातील परिस्थिती दिवसागणिक अधिक बिकट होत आहे. अनेक राज्यांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इंजेक्शन अभावी कोरोना रुग्णांना आपला प्राण गमावावा लागत आहे. यात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहिमही अत्यंत वेगाने सुरु आहे. दरम्यान कोरोना आकडेवारीबाबत एक दिलासाजनक माहिती समोर येत आहे. कारण गेल्या २४ तासांत कालच्या कोरोना रुग्णसंख्येच्या तुलनेत आज काही अंशी घट झाल्याचे पाहयला मिळाले.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मंगळवारी हीच कोरोना रुग्णसंख्या ३ लाख ५२ हजार ९९१ इतकी होती तर मृतांचा आकडा २८१२ वर पोहचला होता, मात्र आज रुग्णसंख्येत २९ हजारांपर्यंत घट झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यामुळे देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास आरोग्य यंत्रणेला यश मिळत असे म्हणावे लागेल.

- Advertisement -

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासात ३ लाख २३ १४४ नव्या कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर २ हजार ७७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात पून्हा दिलासाजनक बाब म्हणजे २ लाख ५१ हजार ८२७ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा संख्येतही आज मोठी वाढ झाली आहे.

- Advertisement -

देशात आत्तापर्यंत १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेला रुग्णांचा आकडा १ लाख ८७ हजार ८९४ इतका झाला आहे. देशात सध्या २८ लाख ८२ हजार २०४ ८६ अॅटिव्ह रुग्ण आहेत. तर १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.


corona vaccine: कोरोना विरोधी लढा होणार तीव्र, sputnik v लस १ मे ला भारतात होणार दाखल


 

 

- Advertisement -