घरCORONA UPDATEcoronavirus: कहर! देशात २४ तासांत ३ लाख ५२ हजार नवे रुग्ण, मृतांचा...

coronavirus: कहर! देशात २४ तासांत ३ लाख ५२ हजार नवे रुग्ण, मृतांचा आकडा २८१२ पार

Subscribe

देशात कोरोना परिस्थिती़ अधिक गंभीर बनत असून दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या नवनवे रेकॉर्ड बनत आहे. यात गेल्या २४ तासात भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. देशात आज ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांचा आकडा २८१२ वर पोहचला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा कहर कायम असून आज कोरोनामुळे मृत्य पावणाऱ्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. तर गेल्या २४ तासांत देशातील २ लाख १९ हजार २७२ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. याबाबतची आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

- Advertisement -

भारतात गेल्या २४ तासांत तब्बल २ हजार ८१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा सर्वाधिक आकडा आज एकट्या भारतात वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्याही १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर देशात आत्तापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या देशात २८ लाख १३ हजार ६५८ अॅटिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात किंवा डॉक्टरांच्या निर्देशानुसार आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये ठेवून उपचार सुरु आहेत.

देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या लसीकरण मोहित वेगाने सुरु आहे. आत्तापर्यंत १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -