Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE India Corona Update: दिलासादायक! देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांसह मृतांची संख्याही...

India Corona Update: दिलासादायक! देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांसह मृतांची संख्याही घटली

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आज देशातील नव्या बाधितांच्या संख्येसह मृतांची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. काल गुरूवारी गेल्या २४ तासात ४१ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून ५०७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र आज ही संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. देशात गेल्या २४ तासात ३५ हजार ३४२ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली तर ४८३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. गेल्या २४ तासात कालच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ६ हजारांनी घट झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३५ हजार ३४२ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४८३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३८ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १२ लाख ९३ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख १९ हजार ४७० जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ४ लाख ६८ हजार ०७९ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ५ हजार ५१३ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सूरू आहे. देशात आतापर्यंत ४५ कोटी २९ लाख ३९ हजार ५४५ हजार नमुन्यांच्या चाचण्या झाल्या. यापैकी काल दिवसभरात १६ लाख ६८ हजार ७१२ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली.

- Advertisement -

- Advertisement -