Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश India Corona Update: गेल्या २४ तासात ३,६८,१४७ नव्या बाधितांची नोंद, ३ हजारांहून...

India Corona Update: गेल्या २४ तासात ३,६८,१४७ नव्या बाधितांची नोंद, ३ हजारांहून अधिकांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक वाढताना दिसतोय. प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात येत नसल्याने देशाची चिंता अधिक वाढली आहे. देशात रविवारी ३ लाख ९२ हजार ४८८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर देशात आतापर्यंतचे सर्वाधिक ३ हजार ६८९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आज देशात ३ लाख ६८ हजार १४७ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३, ४१७ जणांचा कोरोनाने बळी गेल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज देशात ३ लाख ६८ हजार १४७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा १ कोटी ९९ लाख २५ हजारांवर पोहोचला आहे तर आतापर्यंत २ लाख १८ हजार ९५९ जणांचे कोरोनामुळे प्राण गेले आहे. देशात सध्या ३४ लाख १३ हजार ६४२ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना १ कोटी ६२ लाख ९३ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना आतापर्यंत १५ कोटी ७१ लाख नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे.

- Advertisement -

रविवारी राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५६ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ लाख २२ हजार ४०१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७० हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल दिवसभरात ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -