घरCORONA UPDATEIndia Corona Update: बाधितांचा आकडा वाढला! गेल्या २४ तासात ३८,७९२ नवे रूग्ण,...

India Corona Update: बाधितांचा आकडा वाढला! गेल्या २४ तासात ३८,७९२ नवे रूग्ण, ६२४ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढल्याने देशाची चिंता वाढली आहे. दिलासाजनक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा वाढत आहे. गेल्या २४ तासात आधीच्या दिवसाशी तुलना करता कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कालच्या दिवसात ३८ हजार ७९२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात ६२४ कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याची दिलासादायक बाब सध्या या समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आज ३८ हजार ७९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४१ हजार रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात गेल्या २४ तासांत ७२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत एकूण ३८ कोटी ७६ लाख ९७ हजार ९३५ कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी गेल्या २४ तासात ३७ लाख १४ हजार ४४१ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

- Advertisement -

देशात आजपर्यंत ३ कोटी ९ लाख ४६ हजार ०७४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३ कोटी १ लाख ४ हजारांहून अधिक रुग्ण आत्तापर्यंत कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. देशात सध्या ४ लाख २९ हजार ९४६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४ लाख ११ हजार ४०८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात ४३ कोटी ५९ लाख ७३ हजार ६३९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १३ जुलै रोजी १९ लाख १५ हजार ५०१ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -