India Corona Update: देशातील नव्या बाधितांमध्ये घट; ३८,९४९ रूग्णांचे निदान; रिकव्हरी रेट ९७.२८ टक्क्यांवर

Mumbai Corona Update: The number of new corona petients in Mumbai has decreased in 24 hours, found 14 deaths

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरूवारी देशात ४१ हजार ८०६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५८१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर आज शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले असून देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ९४९ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ५४२ जणांचा कोरोनामुळे प्राण गेला तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करण्याची संख्या देशात वाढती आहे. गेल्या २४ तासात ४० हजारांपेक्षा २६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ९७.२८ टक्के इतका रिकव्हरी रेट आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १० लाख २६ हजार ८२९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख १२ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १ लाख ८३ हजार ८७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख ३० हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत देशात ३८ लाख ७८ हजार ०७८ जणांचे लसीकरण पार पडले आहे. आतापर्यंत देशात ३९ कोटी ५३ लाख ४३ हजार ७६७ जणांना लस दिली गेली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

देशातील रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर ९७.२८ टक्क्यांवर पोहोचला असून अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.३९ टक्के आहे. देशात आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या २.१४ टक्के आहे तर रोजचा पॉझिटिव्हिटी रेट १.९९ टक्क्यांवर आहे. सलग २५ व्या दिवशी रोजच्या पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली घसरल्याचे दिसून येत आहे. तसेच देशाने कोरोना चाचणीचा टप्पा ४४ कोटी पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.