घरCORONA UPDATEदेशात कोरोनाचा हैदोस! २४ तासांत ३ लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण,...

देशात कोरोनाचा हैदोस! २४ तासांत ३ लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण, मृतांचा आकडा ३५०० पार

Subscribe

भारतात कोरोनाचा दुसरा लाटेने हैदोस घातला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता देशाला कोरोनाने घट्ट विळखा घातला असल्याचे स्पष्ट होते आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ३ लाख ९२ हजार ४८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मृतांचा आकडा साडे तीन हजारांचा पार गेला आहे. त्यामुळे देशात दररोज नोंदवली जाणारी  रेकॉर्डब्रेक आकडेवारी पाहता चिंतेत अधिक भर पडत आहे. देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ वर पोहचली आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आज ३ लाख ९२ हजार ४८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधितांचा देशातील आत्तापर्यंतचा एकूण आकडा १ कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ३६८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख १५ हजार ५४२ वर पोहचली आहे. यात दिलासाजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ७ हजार ८६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंत १ कोटी ५९ लाख ९२ हजार २७१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ कोरोनाचे अॅटिव्ह रुग्ण असून १५ कोटी ६८ लाख १६ हजार ३१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.


Assembly Election Results 2021 LIVE : पंढरपुरात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आघाडीवर; समाधान आवताडे पिछाडीवर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -