India Corona Update: एका दिवसात बाधितांचा आकडा वाढला; ३९,७४२ नवे रूग्ण, ५३५ जणांचा मृत्यू

Entrepreneurs task force formed under the chairmanship of the Minister of Industry
उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचा कृतीदल गठीत

देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आज देशातील नव्या बाधितांच्या संख्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशासमोरील चिंतेत अधिक भर पडली आहे. शनिवारी २४ तासांत देशात ३९, ०९७ नवे बाधित रुग्ण आढळले होते तर ५४६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आज रविवारी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या २४ तासात ३९,७४२ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ५३५ जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असून ३९ हजार ९७२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३९ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले असून ५३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३९ हजार ९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १३ लाख ७१ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २० हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ५ लाख ४३ हजार १३८ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ८ हजार २१२ जणांवर उपचार सुरू आहेत.