घरताज्या घडामोडीIndia Corona Update: दिलासा! नव्या बाधितांसह मृतांचा आकडा घटला; ३९,७९६ नवे रूग्ण,...

India Corona Update: दिलासा! नव्या बाधितांसह मृतांचा आकडा घटला; ३९,७९६ नवे रूग्ण, ७२३ मृत्यू

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना आता कोरोनाचे व्हेरिएंट देखील देशाची चिंता वाढवताना दिसताय. यासह देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. रविवारी देशात गेल्या २४ तासांत ४३ हजार ०७१ नव्या कोरोनाबाधिततर ९५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या तुलनेत आज सोमवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. आज देशात गेल्या २४ तासात ३९ हजार ७९६ जणांना कोरोनाची लागण झाली तर ७२३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज ४२ हजार ३५२ वर पोहचली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ३९ हजारांहून अधिक बाधित आढळ्याने देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ०५ लाख ८५ हजार २२९ झाला आहे. तर आजपर्यंत २ कोटी ९७ लाख ०७८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ४ लाख ८२ हजार ७१ इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ०२ हजार ७२८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३५ कोटी २८ लाख ९२ हजार ०४६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात  दर १० लाख लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्ग होणाऱ्यांची संख्या आणि कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होत आहेत. यासोबतच नव्या रूग्णांचे निदान होण्याच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्या वाढतेय तर सक्रिय रूग्णांत देखील घट होताना दिसतेय. आतापर्यंत देशभरात ४१ कोटी ९७ लाख ७७ हजार ४५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी ४ जुलै रोजी १५ लाख २२ हजार ५०४ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -


दिलासा! कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण एका आठवड्यात ३२ टक्क्यांनी घटले, संसर्गही ११ टक्क्यांनी झाले कमी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -