Corona Update In India : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाबाधित (Covid 19) रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील २४ तासांत ४ हजार ४१ इतक्या नवीन कोरोनाबाधित (Corona Virus) रूग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांहून चार हजारांवर पोहोचली आहे. आधीच्या दिवशी देशात ३ हजार ७१२ इतक्या नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आज कोरोनाबाधितांचा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे.

कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार १७७ वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २६ लाख २२ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे. आतापर्यंत ५ लाख २४ हजार ६५१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : COVID 19 India: देशात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने घट; आरोग्य मंत्रालयाने सांगितले, तिसरी लाट कशी नियंत्रणात आली?

महाराष्ट्र, केरळ आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा प्रकरणं वेगाने वाढत आहेत. गुरुवारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३५.२ टक्क्यांनी वाढली होती. मुंबईत १७ दिवसांनंतर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १ हजार ४५, दिल्लीमध्ये ३७३, तामिळनाडू १४५, तेलंगणात ६७, गुजरातमध्ये ५० तर मध्य प्रदेशमध्ये २५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

कर्नाटकच्या आरोग्य मंत्री के. सुधाकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी गुरुवारी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.


हेही वाचा : अनोळखी बॅगमुळे ठाणे महापालिका परिसरात उडाला गोंधळ, बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाला केले पाचारण