घरताज्या घडामोडीकोरोनाचा पुन्हा उद्रेक! देशात गेल्या २४ तासांत ४,१२,२६२ नव्या रुग्णांची नोंद; ३...

कोरोनाचा पुन्हा उद्रेक! देशात गेल्या २४ तासांत ४,१२,२६२ नव्या रुग्णांची नोंद; ३ हजारांहून अधिक बळी

Subscribe

बुधवारी देशात ३ लाख ८२ हजार ३१५ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३, ७८० जणांचा कोरोनाने बळी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर गेल्या २४ तासात देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ४ लाख १२ हजार २६२ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३,९८० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे देशात बाधितांचा एकूण आकडा वाढून २ कोटी १० लाख ७७ हजरांवर पोहोचला आहे तर एकूण २ लाख ३० हजार ६८ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असताना देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. या काळात दिलासादायक बाब म्हणजे १ कोटी ७२ लाख ८० हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना आतापर्यंत १६ कोटी २५ लाख ३२ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक!

दरम्यान देशातील मृत्यूसंख्या वाढली असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा या राज्यांमध्ये मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे, अशी चिंता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केली होती. दरम्यान बुधवारी महाराष्ट्रातील कोरोनाच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ९२० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर मुंबईत ३ हजार ८७९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही दिवसात वाढली होती. मात्र बुधवारी केवळ ३ हजार ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत दिवसभऱात ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ही १३ हजार ५४७ इतकी आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -