घरCORONA UPDATEIndia Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांमध्ये घट तर मृतांमध्ये वाढ; ४१,६४९...

India Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांमध्ये घट तर मृतांमध्ये वाढ; ४१,६४९ नवे रूग्ण, ५९३ मृत्यू

Subscribe

देशात शुक्रवारी ४४,२३० नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती तर ५५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यासह ४२ हजारांहून अधिकांनी कोरोनाला हरवून त्यावर मात केली होती. मात्र कालच्या तुलनेत आज शनिवारी देशात कोरोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४१ हजार ६४९ जणांना कोरोनाची लागण झाली तर यादरम्यान ५९३ जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला. यासह दिवसभरात ३७ हजारांहून अधिक कोरोनारूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ६४९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५९३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३७ हजार २९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी १६ लाख १३ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ४ लाख २३ हजार ८१० जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या देशात ४ लाख ८ हजार ९२० सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून अद्याप कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ जुलैपर्यंत देशभरात ४६ कोटी १५ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. यासह आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४६ कोटी ६४ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १७.७६ लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.

- Advertisement -

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -