घरताज्या घडामोडीIndia Corona Updates: चिंता वाढतेय! जगभरात २४ तासांत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात

India Corona Updates: चिंता वाढतेय! जगभरात २४ तासांत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, इराण, जपानमध्ये भारताहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या देशातील चिंता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

आज आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४२ हजार ९०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३८० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३४ हजार ७६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २७ लाख ३७ हजार ९३९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३८ हजार २१० जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १९ लाख २३ हजार ४०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ६३ कोटी ४३ लाख ८१ हजारांहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

वर्ल्डोमीटर वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगात काल भारतात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल अमेरिकेत ३७ हजार २६२, ब्रिटनमध्ये ३३ हजार १९६, इराणमध्ये ३१ हजार ५१६, जपानमध्ये २२ हजार ७४८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, जी भारताच्या संख्येहून कमी आहे. तसेच रशिया, मॅक्सिको, इराण, इंडोनेशियात या देशांमध्ये भारताहून कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – तालिबानला भारतासोबत व्हाया पाकिस्तान पुन्हा निर्माण करायचेत व्यापार संबंध


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -