Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE India Corona Update: गेल्या २४ तासांत ४३,५०९ नव्या बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट...

India Corona Update: गेल्या २४ तासांत ४३,५०९ नव्या बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.३८ टक्क्यांवर

Related Story

- Advertisement -

बुधवारी देशात ४३ हजार ६५४ नव्या कोरोना बाधितांसह ६४० जणांचा कोरोनाने बळी गेलेल्यांची नोंद करण्यात आली होती. तर ४१ हजारांहून अधिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली. कालच्या तुलनेत गुरूवारी कोरोना बाधित रूग्णांमध्ये किंचीत घट झाल्याचे समोर आले असून आज ४३ हजार ५०९ इतक्या नव्या बाधितांचे निदान करण्यात आले आहे. तर दिवसभरात ३८ हजार ४६५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ७ लाख १ हजार ६१२ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या देशात ४ लाख ३ हजार ८४० इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरू आहे. दरम्यान, सध्या देशात सक्रिय रूग्णांचे प्रमाण १.२८ टक्के तर रिकव्हरी रेट हा ९७. ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा ५ टक्क्यांनी कमी झाला असून सध्या तो २.३८ टक्क्यांवर आहे. तर दैनंदिन येणाऱ्या कोरोना आकडेवारीनुसार, पॉझिटिव्हीटी दर हा २.५२ टक्के असा असून त्यात ५ टक्क्यांनी घसरण होताना दिसतेय. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोना बाधितांमध्ये चढ-उतार बघायला मिळत असला तरी देखील कोरोना चाचणी करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. देशात सध्या ४६.२६ कोटी नमुने कोरोना चाचणीसाठी तपासण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २९ जुलैपर्यंत देशभरात ४५ कोटी ०७ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. यासह आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४६ कोटी २६ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १७.२८ लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -