Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE India Corona Update: गेल्या २४ तासांत ४४,२३० नव्या बाधितांची नोंद; ५५५ जणांचा...

India Corona Update: गेल्या २४ तासांत ४४,२३० नव्या बाधितांची नोंद; ५५५ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ४० हजारांच्या आसपास नव्या बाधितांची नोंद करण्यात येत होती, मात्र आठवड्याच्या सुरूवातीला हा बाधितांचा आलेख घसरताना दिसला होता. मात्र आठवड्याच्या अखेरीस पुन्हा बाधितांची संख्या वाढल्याने चिंतेत देखील वाढ झाली आहे. गुरूवारी कोरोना बाधित रूग्णांमध्ये किंचीत घट झाल्याचे समोर आले असून ४३,५०९ इतके बाधित समोर आले होते. तर दिवसभरात ३८,४६५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र आज कालच्या तुलनेत बाधितांमध्ये काहिशी वाढ झाली असून ४४ हजार २३० नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली तर ५५५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासह ४२ हजारांहून अधिकांनी कोरोनाला हरवून त्यावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार २३० नवे कोरोनाबाधित आढळले असून ५५५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४२ हजार ३६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २३ हजार २१७ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ७ लाख ४३ हजार ९७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या देशात ४ लाख ५ हजार १५५ सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून अद्याप कोरोना लसीकरण वेगाने सुरू असल्याचे दिसतंय. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ३० जुलैपर्यंत देशभरात ४५ कोटी ६० लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. यासह आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४६ कोटी ४६ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १८.१६ लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.

- Advertisement -


कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस!

- Advertisement -