घरताज्या घडामोडीदेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत; नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत; नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

Subscribe

देशात सध्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहेत. देशात दररोज सर्वाधिक रुग्णांची नोंद केरळमध्ये होत आहेत. त्यामुळे सतत देशात दररोज ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. यामुळे सध्या कोरोना तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ८३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४६० जण मृत्यूमुखी पडले आहे. तर ३५ हजार ८४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ६८ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २६ लाख ९५ हजार ३०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८३० जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १८ लाख ८८ हजार ६४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ६३ कोटी ९ लाख १७ हजार लोकांचे लसीकरण पार पडले आहे.

केरळमध्ये शनिवारी ३१ हजार २६५ नव्या कोरोनाबाधित आढळले होते. तर १५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती आणि २१ हजार ४६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. केरळमधील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३९ लाख ७७ हजार ५७२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २१ हजार ४६८ जण कोरोनामुक्त झाले असून २० हजार ४६६ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – एका दिवसात १ कोटी लोकांचे लसीकरण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -