India Corona Update : देशात ८० दिवसानंतर आज ६० हजाराहून कमी रुग्णांची नोंद, तर १५७६ मृत्यू

आतापर्यंत देशात ३९  कोटींहून अधिक कोरोना टेस्ट

India Corona Update India reports 58,419 new corona cases less than 60,000 after 81 days and 1576 deaths in last 24 hrs says Health Ministry
India Corona Update:देशात ८० दिवसानंतर आज ६० हजाराहून कमी रुग्णांची नोंद, तर १५७६ मृत्यू

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. कारण देशात गेल्या ८० दिवसानंतर आज ६० हजाराहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्या जरी घटत असली तरी मात्र मृतांचा आकडा फारसा कमी झालेला नाही. देशात आज ५८ हजार ४१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८७ हजार ६१९ रुग्ण कोरोनातून मुक्त होत घरी परतले आहेत. त्यामुळे देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ५८ हजार ४१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील आत्तापर्यंत नोंद झालेली एकूण रुग्णसंख्याही २ कोटी ९८ लाख ८१ हजार ९६५ झाली आहे. तर आज १५७६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा आजपर्यंतचा आकडा हा ३ लाख ८६ हजार ७१३ झाला आहे. देशात काल दिवसभरात ८७ हजार ६१९ कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत २ कोटी ८७ लाख ६६ हजार ०९ नागरिक कोरोनामुक्त मुक्त झाले आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख २९ हजार २४३ झाली आहे.

आतापर्यंत देशात ३९  कोटींहून अधिक कोरोना टेस्ट
१९ जूनपर्यंत देशभरात २७ कोटी ६६ लाख ९३ हजार ५७२ कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत ३८ लाख १० हजार नागरिकांना लस देण्यात आली. दे. तसेच आतापर्यंत ३९ कोटी १० लाख १९ हजार ०८३ नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर यातील जवळपास १८ लाख ११ हजार ४४६ कोरोना सॅम्पल गेल्या २४ तासांत टेस्ट करण्यात आलेत.. ज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांहून अधिक आहे.


कुडाळ राडा प्रकरण: आमदार वैभव नाईकांसह सेना- भाजपाच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल