काहीसा दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; 24 तासात 6594 नवे रुग्ण

देशात एकाच दिवसात 4,035 कोरोना रुग्ण बर होऊन घरी परतले आहेत

India reports 6,594 COVID19 cases as active cases rise to 50 548

भारतात कोरोनाची चौथी लाट येण्याचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. कारण देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आता रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरिएंटने देखील चिंतेत अधिक भर घातली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मात्र कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. कारण काल आठ हजारांचा आकडा पार करणारी कोरोना रुग्णसंख्या आज सहा हजारांवर आली आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 6,594 नवीन रुग्ण आढळून आले. काल म्हणजे 13 जुनला 8,084 नवीन रुग्ण आढळले होते. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 50,548 वर पोहोचलीय. यामुळे सक्रिय रुग्णांचा टक्का 0.12 झाला आहे.

देशात एकाच दिवसात 4,035 कोरोना रुग्ण बर होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत 4,26,61,370 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे पुनर्प्राप्ती दर 98.67 टक्के झाला आहे. कोरोनाचा दिवसाचा सकारात्मकता दर 2.05 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 2.32 टक्क्यांवर पोहचला आहे.


मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; पुढील दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या देणार