देशात २४ तासांत २४ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४२५ जणांचा मृत्यू

२४ तासांत देशात २४ हजार २४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे.

globally Corona patient highest growth recorded in india in 24 hours, 3 lakh 14 thousand new patients added
World record : भारतात 24 तासात कोरोना रूग्णसंख्या वाढीचा विक्रम, ३ लाख १४ हजार नव्या रूग्णांची भर

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २४ हजार २४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहोचली असून मृतांची संख्या १९ हजार ६९३ झाली आहे. तसेच २ लाख ५३ हजार २८७ active केसेस असून ४ लाख २४ हजार ४३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात आतापर्यंत ९९ लाख ६९ हजार ६६२ जणांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये रविवारी १ लाख ८० हजार ५९६ जणांची चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

तर रविवारी राज्यात ६ हजार ५५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २,०६,६१९ झाली आहे. राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. रविवारी ३६५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १,११,७४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०८ टक्के एवढे झाले आहे.


हेही वाचा – Coronavirus Live Update : राज्यात ६५५५ नवीन रुग्ण; १५१ रुग्णांचा मृत्यू