घरCORONA UPDATECoronavirus India Update: दिलासादायक! देशात ९ लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय; ७२ दिवसांत...

Coronavirus India Update: दिलासादायक! देशात ९ लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय; ७२ दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक घट

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १ लाखापेक्षा कमी रुग्णांची नोंद आहे. आज ७२ दिवसांत नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ७० हजार ४२१ नवे कोरोनाबाधिथ आढळले असून ३ हजार ९२१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख १९ हजार ५०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहेत.

आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९५ लाख १० हजार ४१०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ७४ हजार ३०५ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ९ लाख ७३ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २५ कोटी ४८ लाख ४९ हजार ३०१ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

देशात १३ जूनपर्यंत ३७ कोटी ९६ लाख २४ हजार ६२६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल रविवारी दिवसभरात १४ लाख ९२ हजार १५२ नमुन्यांच्या चाचण्या पार पडल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात बाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट

महाराष्ट्रात शुक्रवारी राज्यात ११ हजार ७६६ बाधितांची नोंद करण्यात आली होती, तर शनिवारी १० हजार ६९७, काल रविवारी १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तसेच काल दिवसभरात ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला आणि ७ गजार ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाख ८ हजार ९९२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला असून ५६ लाख ३९ हजार २७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात १ लाख ११ हजार १०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Covid-19: भारतासह २६ देशांवर पाकिस्तानकडून निर्बंध; पुढील आदेशापर्यंत प्रवासास बंदी 


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -