Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक २४, ८५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक २४, ८५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली आहे. देशांत मागील २४ तासांत सर्वाधिक २४ हजार ८५० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६१४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाख ७३ हजार १६५वर पोहोचला असून यापैकी १९ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४ लाख ९ हजार ८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या २ लाख ४४ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

 

देशात ४ जुलैपर्यंत तब्बल ९७ लाख ८९ हजार ६६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी देशात काल २ लाख ४८ हजार ९३४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांवर पोहोचला आहे. तसेच महाराष्ट्राच्या पाठोपाठ सर्वाधिक कोरोनाबाधिक रुग्ण तामिळनाडू राज्यात आढळले आहे. तामिळनाडूत १ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राजधानी दिल्ली ९७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात १४ राज्यांमध्ये १० हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १८० नव्या रूग्णांची वाढ


 

- Advertisment -