India-Canada Tensions: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणाव आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर हा तणाव निर्माण झाला. दरम्यान, हिंदूंना धमकावणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हिंदूंना देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. कॅनडाचे सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी या व्हिडीओचा निषेध केला आहे. (India s cash strapped role Canada Minister Dominic LeBlanc reprimands Gurpatwant Singh Pannun for threatening Hindus )
शीख फॉर जस्टिसने व्हिडीओ केला जारी
मिळालेल्या माहितीनुसार, शिख फॉर जस्टिस या खलिस्तान समर्थक संघटनेने हा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय वंशाच्या हिंदूंना देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा जुना असल्याचे सांगण्यात येत आहे.
कॅनडामध्ये द्वेष आणि धमक्यांना स्थान नाही
कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक म्हणाले की सर्व कॅनेडियन लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे. हिंदू कॅनेडियन लोकांना लक्ष्य करणारा व्हिडिओ कॅनेडियन मूल्यांच्या विरुद्ध आहे. आक्रमक कृत्ये, द्वेष, धमकावणे किंवा भीतीचे वातावरण कॅनडात निर्माण केलं जाऊ शकत नाही, असं डॉमिनिक लेब्लँक म्हणाले.
कॅनडाचे आणखी एक मंत्री हरजित सज्जन म्हणाले की, हिंदूंना देश सोडण्यास सांगणे हे स्वातंत्र्य मुल्यांच्या विरोधात आहे.
व्हिडीओ जारी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
कॅनेडियन हिंदूज फॉर हार्मनी या संघटनेने व्हिडीओ जारी करणाऱ्यांविरोधात कॅनडाच्या सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. तुम्ही दोषींवर द्वेषाचा गुन्हा का दाखल करत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला.
गुरपतवंत पन्नूचा व्हिडीओ व्हायरल
SFJ चे कायदेशीर सल्लागार गुरपतवंत पन्नूचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणालाय की, भारतीय वंशाच्या हिंदूंनी कॅनडा सोडावं. तुम्ही भारतात जा. तुम्ही केवळ भारताचेच समर्थन करत नाही, तर खलिस्तान समर्थक शिखांचे भाषण आणि अभिव्यक्ती दडपण्याचे समर्थन करत आहात. निज्जरच्या हत्येचा आनंद साजरा करून तुम्ही हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहात.
पन्नूला भारतात दहशतवादी घोषित करण्यात आलंय
पन्नूने 18 जून रोजी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा संदर्भ देताना सांगितलंय की, त्याला भारतात दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.
(हेही वाचा: उदयनिधींना सुप्रीम कोर्टाची नोटीस; द्रमुक आणि तामिळनाडू सरकारलाही उत्तर द्यावं लागणार )