12 हजारांपेक्षा कमी किमतींच्या स्मार्टफोनवर येणार बंदी; भारताचा चीनला आणखी एक झटका

भारताने आतापर्यंत चीनच्या 300 हून अधिन अॅप्सवर बंदी आणली आहे. त्यानंतर आता भारत स्मार्ट फोनवरही बंदी आणणार आहे. त्यानुसार, चीनी कंपनींच्या 12,000 रुपयांहून कमी किमतींच्या फोनवर बंदी आणली जाणार आहे. या स्मार्ट फोनवर बंदी आणत भारत देशी बनावटीच्या फोन्स निर्माता कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे.

भारताने आतापर्यंत चीनच्या 300 हून अधिन अॅप्सवर बंदी आणली आहे. त्यानंतर आता भारत स्मार्ट फोनवरही बंदी आणणार आहे. त्यानुसार, चीनी कंपनींच्या 12,000 रुपयांहून कमी किमतींच्या फोनवर बंदी आणली जाणार आहे. या स्मार्ट फोनवर बंदी आणत भारत देशी बनावटीच्या फोन्स निर्माता कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या भारतात चीनी मोबाइल फोनची विक्री सर्वाधिक होत आहे. या मोबाईची किंमत अन्य ब्रँडच्या मोबाइलपेक्षा कमी असून, खूप सारे फीचर उपलब्ध असल्याने चीनी मोबाइल भारतात जास्त विकले जात आहेत. (India Seeks To Ban Chinese Phones Cheaper Than Rs 12000)

स्मार्ट फोनवर बंदी आणल्यास भारताकडून आणखी एक झटका बसणार आहे. दरम्यान, चीननंतर भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाइल बाजारपेठ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 हजाराहून कमी किंमतीच्या फोन्सवर बंदी आणून भारतीय फोन बाजारपेठेतील चीनी कंपन्यांना बाहेर काढण्याचा भारताचा उद्देश्य आहे. भारतीय मोबाइलच्या कमी किंमतीच्या मार्केटवर रियलमी आणि ट्रांससियन यांसारख्या चीनी कंपन्यांनी मजबूत पकड आहे.

चीनी कंपन्यांनी गेल्या काही वर्षात भारतीय बाजारपेठेच्या भरवशावर मोठी ग्रोथ केली आहे. मात्र भारतातील एंट्री-लेवल मार्केटमध्ये जर चीनी मोबाइल फोनवर बॅन आणले तर Xiaomi यांसारख्या चीनी कंपन्यांना जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, भारत आधीपासूनच देशात काम करत असलेल्या चीनी कंपनी म्हणजेच Xiaomi आणि Oppo तसेच Vivo कंपन्याची चौकशी करत असल्याची माहिती मिळते. या कंपन्यांवर टॅक्स चोरी व मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लावण्यात आले आहेत.

दरम्यान, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाइल बाजारपेठ आहे आणि लवकरच जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ होण्याचा दिशेने वाटचाल करत आहे. सध्या स्मार्टफोनचे 80 टक्के मार्केट चीनच्या ताब्यात आहे. चीन अनेक स्वस्त फोन बाजारात आणत आहे. त्यामुळे 12 हजारांपेक्षा कमी किमतीच्या मोबाईल्सवर बंदी घालण्याचा विचार आहे. त्यामुळे स्वदेशी कंपन्यांना संधी मिळणार आहे.


हेही वाचा – गूगलनंतर जगभरात ट्विटर डाऊन, नेटकरी त्रस्त