घरदेश-विदेशमोदी सरकारच्या योजनांमुळे भारत उजळला, इस्त्रोचा अहवाल सांगतो देशाने प्रगती साधली!

मोदी सरकारच्या योजनांमुळे भारत उजळला, इस्त्रोचा अहवाल सांगतो देशाने प्रगती साधली!

Subscribe

Night Time Lights | देश रात्रीच्या वेळीही प्रकाशमान होत असल्याने देशाची प्रगती झाली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या सौभाग्य योजना आणि उज्ज्वला योजनांचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे.

Night Time Lights | नवी दिल्ली – भारतात विकास झाला आहे असं नोंदवणारा एक अहवाल इस्रोच्या नॅशनल सेन्सिंग अहवालातून (National Sensing Report) समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांत भारतात रात्रीच्या वेळी लागणाऱ्या दिव्यांमध्ये (Night Time Lights)  ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच, देश रात्रीच्या वेळीही प्रकाशमान होत असल्याने देशाची प्रगती झाली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या सौभाग्य योजना आणि उज्ज्वला योजनांचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे.


इस्रोच्या अहवालानुसार, गेल्या दशकात भारतात रात्रीच्या वेळी दिवे लावण्यात 43%ने वाढ झाली आहे. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचा अहवाल भारतातील विकासाचा वेग कसा झपाट्याने वाढत असल्याचं स्पष्ट करत आहे. रात्रीच्या वेळीही देश प्रकाशमान होत असल्याने देशाची प्रगती होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या विषयावर राष्ट्रीय विज्ञान केंद्राचे (National Science Centre) संचालक एन रामदास अय्यर म्हणाले की, जर रात्रीच्या वेळी प्रकाश वाढला असेल तर याचा अर्थ देशात विकास झाला आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, भारतात महामार्ग आणि पायाभूत सुविधाही वाढल्या आहेत. शहरीकरण वाढले आहे. ग्रामीण भागातही विकास झाला आहे.

- Advertisement -


मोदी सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्या ग्रामीण भारताला उजळत आहेत. सौभाग्य योजनेंतर्गत 2021 पर्यंत 2.8 कोटी घरांचे विद्युतीकरण करण्यात आले. 2014-15 मध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 97,830 किमी होती, परंतु सध्या ती सुमारे 1.45 लाख किमी आहे. यामुळे देशात रात्रीच्या वेळी दिवे लावण्यातही मोठी वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -