पगडीसाठी शीख कुस्तीपटूने सोडली आंतरराष्ट्रीय स्पर्धा

क्रीडा मंत्रालयाला केलेल्या तक्रारीनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली दखल. ट्विट करुन दिलं आश्वासन.

jassa patti
पहेलवान जस्सा पट्टी

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू जस्सा पट्टी याने तुर्की येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे. स्पर्धेदरम्यान त्याला पटक (पगडी) घालण्यास बंदी केल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (युडब्लूडब्लू) च्या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी जस्सा पट्टीच्या कोचने भारतीय क्रीडा मंत्रालयाला तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली आहे. या संदर्भात सुषमास्वराज यांनी नुकतेच ट्विट करुन या बाबत योग्य ती चौकशी केली जाईल असे सांगितले.

काय आहे प्रकार

जस्सा पट्टी हा पंजाब येथील कुस्तीपटू असून पंजाब पोलीसमध्ये कार्यरत आहे. त्याने अनेक राष्ट्रीय खेळांमध्ये भाग विजय मिळवले आहे. तुर्की येथे आयोजित केलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. येथील रिंगमध्ये उतरल्यावर त्याने घातलेली पटक काढण्यास आयोजकांकडून सांगण्यात आले. तेव्हा त्याने पटक काढण्यास नकार दिला. पटक काढल्यामुळे त्याला स्पर्धा खेळण्यास अडचन येईल असे त्याने सांगितले. अखेर त्याने आपले नाव स्पर्धेतून बाहेर घेतले.

“मला पटक बरोबर स्पर्धेत भाग घेऊ न दिल्याने भारतीय क्रीडा मंत्रालय लवकरच युडब्ल्यूयुडब्ल्यू बरोबर पत्रव्यवहार करणार आहे. प्रतिस्पर्धीकडून दूखापत होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पटक घालायची परवानगी आहे. मात्र आयोजकांनी माझ ऐकल नाही. म्हणून मी अखेर माझे नाव बाहेर घेतले. २५ च्या वयोगटात भारताकडून खेळणारा मी एकमेव खेळाडू होतो. मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता राहिलो आणि ऑल इंडिया इंटरयूव्हॅन्सी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक विजेता झालोय.” – कुस्तीपटू जस्सा पट्टी

या घटनेनंतर युवा व्यवहार व क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे सांगितले आहे.