घरदेश-विदेशभारताने रशियासोबत केले क्षेपणास्त्र करार

भारताने रशियासोबत केले क्षेपणास्त्र करार

Subscribe

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी भारताने रशियासोबत २०० कोटींची करार केला आहे. या करारमुळे 'एमआय-३५' या भारताच्या हेलिकॉप्टरची क्षमता वाढणार आहे.

पुलवामा हल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियासोबत आणखी एक करार केला आहे. भारताने रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी रशियासोबत २०० कोटी रुपयांचा करार केला आहे. सरकारकडून पुलावामा हल्लानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. म्हणून आपल्या गरजेनुसार तिन्ही सैन्य दल ३०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे खरेदी करु शकतात. आपल्या एमआय-३५ या हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही क्षेपणास्त्रे आणीबाणीच्या परिस्थितीसाठी खरेदी केली जाणार आहे.

- Advertisement -

राजनाथ सिंह यांनी मागील आठवड्यात तिन्ही सैन्य दलांकडून होणाऱ्या खरेदीबाबत प्रझेंटेशन दिले होते. यामध्ये हवाई दल हे आपात्कालीन तरतुदींचा वापर करून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यामध्ये पुढे आहे. भारत स्वतःला कोणत्याही युद्धामध्ये सज्ज ठेवण्यासाठी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्राचा करार आणि २००० स्टँड ऑफ वेपन सिस्टिसोबत अनेक स्पेअर पार्टचा करार देखील या तरतुदीनुसार भारत करणार आहे.

भारत हा अनेक वर्षापासून रशियासोबत क्षेपणास्त्र खरेदी करण्यास इच्छूक होता. एका दशकानंतर ही भारताची इच्छा पूर्ण झाली आहे. भारताने ‘स्ट्रम अटाका’ या क्षेपणास्त्राचा करार रशियासोबत केला आहे. एमआय-३५ या हेलिकॉप्टरला ‘स्ट्रम अटाका’ हे क्षेपणास्त्र लावण्यात येणार आहे. यामुळे एमआय-३५ या हेलिकॉप्टरची क्षमता वाढणार आहे. भारतीय हवाई दलाचे एमआय-३५ हे हेलिकॉप्टर थेट हल्ला करणारे हेलिकॉप्टर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -