घरCORONA UPDATECorona: कोरोनाशी लढण्यात आतापर्यंत भारत अग्रेसर; इतर देशांना टाकले मागे

Corona: कोरोनाशी लढण्यात आतापर्यंत भारत अग्रेसर; इतर देशांना टाकले मागे

Subscribe

आयसीएमआरचे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात सर्वात चांगल्या आणि जास्त प्रमाणात चाचण्या या भारतात होत आहेत.

जगभरात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सर्व देश आपापल्या परीने आरोग्य सुविधांमध्ये वैविध्यता आणत कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतानेही सर्वतोपरी प्रयत्न करत कोरोनाशी लढून त्याला हरवण्याचा चंग बांधला आहे. यामध्ये भारत काही अंशी यशस्वीही होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत कोरोनाला रोखण्याच्या प्रयत्नात इतर देशांच्या तुलनेत भारतच अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. जर भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढण्याचा कल पाहिला तर इतर देशांच्या तुलनेत त्याला जास्त कालावधी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाच्या चाचण्यात कमी होत असल्याचा आरोप लागला जात असला तरी आपल्या देशात २४ चाचण्या केल्यानंतर कुठे एक रुग्ण कोरोनाबाधित आढळतो. तर अमेरिकेत मात्र ५ चाचण्यांच्या मागे एका रुग्णाची भर पडत आहे.

हेही वाचा – Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात या चार क्षेत्रातून घरबसल्या कमाई करा!

- Advertisement -

२४ चाचण्यांमागे एक कोरोना रुग्ण 

आयसीएमआरचे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात सर्वात चांगल्या पद्धतीच्या चाचण्या या भारतात होत आहेत. कोरोना चाचण्यांसाठी जपानचे उदाहरण दिले जाते. मात्र जपानमधील एक रुग्ण शोधण्यासाठी ११.७ चाचण्या कराव्या लागत आहेत. तर इटलीमध्ये ६.७ चाचण्या, अमेरिकेत ५.३ चाचण्या आणि ब्रिटनमध्ये ३.४ चाचण्यांची नोंद आहे. तर भारतात एक रुग्ण शोधण्यासाठी २४ चाचण्या होत आहेत. त्यामुळे एका रुग्णासाठी भारत इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त चाचण्या करत आहे. तसेच कोरोनाचे केसेस नसलेल्या परिसरातही आपण सर्दी, खोकल्या आणि श्वास घेण्याकरता त्रास होणाऱ्या लोकांच्या चाचण्या करत आहोत, असेही डॉक्टरांनी सांगितले.

चाचण्याचे प्रमाण भारतात अधिक 

देशात ५ आणि १० हजार कोरोनाची संख्या होईपर्यंत जगात इतर राज्यांच्या चाचण्यांचा अहवाल पाहिला तर फक्त कॅनडा हे भारतापेक्षा पुढे आहे. कॅनडामध्ये ५ हजार रुग्ण होईपर्यंत त्यांच्या २ लाख ४१ हजार १३८ चाचण्या झाल्या होत्या. तर १० हजारांच्या आकड्यापर्यंत २ लाख ९५ हजार ०६५ चाचण्या त्यांनी केल्या होत्या. तर अमेरिकेने क्रमशः केवळ १ लाख ०४ हजार ०७३ आणि १ लाख ३९ हजार ८७८ चाचण्या केल्या होत्या. याबाबतीत इटली आणि ब्रिटनही खुप मागे आहेत. तर भारताने १ लाख १४ हजार ०१५ आणि २ लाख १७ हजार ५५४ चाचण्या केल्याची नोंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -