घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: स्पेनला मागे टाकत भारत ५व्या स्थानावर

Coronavirus: स्पेनला मागे टाकत भारत ५व्या स्थानावर

Subscribe

लॉकडाऊन जाहीर करुनही भारतात कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग मंदावला नाही. सतत वाढणाऱ्या रुग्णांमुळे भारताने आता इटली आणि स्पेनला देखील मागे टाकले आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येच्या आकड्यामध्ये आता भारत पाचवा देश बनला आहे. ncov2019.live या जागतिक डॅशबोर्डद्वारे ही आकडेवारी समोर आली आहे. भारतात सध्या २ लाख ४७ हजार रुग्ण असून स्पेनमध्ये २ लाख ४१ हजार रुग्ण आहेत. तर इटलीमध्ये २ लाख ३४ हजार रुग्ण आहेत. असे असले तरी मृत्यूंच्या संख्येत मात्र भारत या दोन्ही देशांच्या तुलनेत कितीतरी मागे आहे.

शनिवारी रुग्णसंख्येत भारताने इटलीला मागे टाकले होते. त्यानंतर २४ तासांत भारतात जवळपास १० हजार रुग्ण वाढल्यामुळे भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. अडीच महिन्यांहून अधिकचा लॉकडाऊन असतानाही भारत कोरोनाचे संक्रमण रोखू शकला नाही, आता अनलॉक सुरु केल्यानंतर हा आकडा किती उसळी घेईल याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -
india in 5th position
जागतिक आकडेवारी

शनिवारी २४ तासांत भारतात ९९७१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर काल एका दिवसांत २८७ मृत्यू झाले होते. त्यामुळे भारतातील रुग्णसंख्या वाढून २,४६,६२८ झाली. भारतात सध्या १,२०,४०६ Active प्रकरणे आहेत. तर १,१९,२९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ६९२९ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रिकव्हरी रेटमध्ये हलकी घसरण दिसली. रिकव्हरी रेट ४८.२७ वरुन ४८.२० वर आला होता. भारतातील १९ राज्यात रुग्णांच्या आकड्यांनी आता चार किंवा पाच अंकी आकडा पार केला आहे. तर तीन राज्यांनी पाच अंकी आकड्यात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -