सुषमा स्वराज यांच्या एका फोनमुळे पाकिस्तानचा भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लॅन फ्लॉप; अमेरिकन मंत्र्याचा मोठा दावा

India sushma swaraj informed me Pak was preparing for nuclear attack post Balakot strike claims mike Pompeo

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यामुळे पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवाया जगासमोर आल्या आहेत. यातून भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दाखवलेल्या चाणाक्ष वृत्तीची देखील जगाला माहिती झाली आहे. पॉम्पियो यांच्या ‘नेव्हर गिव्ह अ‍ॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात भारताचा बालाकोट सर्जिकल स्ट्राइकसह भारतातील अनेक मंत्र्यांवर भाष्य करण्यात आल आहे. यात पॉम्पिओ यांनी लिहिलं की, भारताने बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान अनुबॉम्ब टाकण्याच्या तयारीत होता. मात्र सुषमा स्वराज यांनी प्रसंगावधान दाखवत पुढाकार घेऊन या संकटातून भारताला वाचवलं.

या पुस्तकात पॉम्पिओ यांनी लिहिलं की, 27- 28 फेब्रुवारी 2019 ची ही गोष्ट आहे. मी अमेरिका – उत्तर कोरिया शिखर संमेलनामध्ये होतो. यावेळी आम्हाला सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीवरून रात्रभर जागून काम करावं लागल होतं. एक मोठं संकट टाळण्यासाठी आम्ही रात्रभर दिल्ली आणि इस्लामाबादमधील संबंधितांसह चर्चा करत होतो. जगाला त्या रात्री समजलं पाहिजे की, तेव्हा भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या जवळ पोहचला आहे. पॉम्पियो याबाबत माहिती देताना सुरुवातीला पाकिस्तानच्या भारताविरोधातील हल्ल्याचीही माहिती दिली आहे. ज्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने नंतर भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची योजना आखली होती. मात्र यावेळी सुषमा स्वराज यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच निर्णय घेतला आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पया यांनी याची माहिती दिली.

या घटनेविषयी पॉम्पियो यांनी पुस्तकात लिहिले की, भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यावेळी आपल्याला झोपेतून उठविले होते. पाकिस्तानने हल्ला केल्यास भारतही प्रतिहल्ला करण्यास तयार असल्याचं स्वराज यांनी म्हटल्याचं पॉम्पियो यांच म्हणणं आहे. यावेळी अणुयुद्ध खूप जवळ येऊन ठेपले होते, इतकेच मला माहिती होतं, असही पॉम्पियो यांनी नमुद केलं आहे.

पॉम्पियो यांनी जेव्हा ही माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी तात्काळ अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आणि पाकिस्तानचे सेनाप्रमूख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. यावेळी बाजवा यांनी सुरुवातीला अणुयुद्धाची शक्यता फेटाळली, यानंतर पॉम्पियोंनी पाकिस्तानची समजूत काढत भारताला पाकिस्तान अणुयुद्धाची तयारी करत नसल्याची माहिती दिली.

पॉम्पियो यांच्या याच पुस्तकात तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची खिल्ली देखील उडवण्यात आली आहे. यावरून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संताप व्यक्त करत पॉम्पियो यांच्यावर टीका केली आहे. पॉम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, त्यांनी त्यांच्या भारतीय समकक्ष सुषमा स्वराज यांना महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्ती म्हणून कधी पाहिलं नाही. परंतु सध्याचे परराष्ट्र मंत्री एस रविशंकर त्यांच्याशी त्यांची पहिल्या भेटीपासून चांगली मैत्री झाली होती.

पॉम्पिओ यांच्या पुस्तकातील या वाक्यावर जयशंकर यांनी उत्तर देत म्हटले की, मी मंत्री पॉम्पिओंच्या पुस्तकातील एका उताऱ्यात श्रीमती सुषमा स्वराज यांचा उल्लेख पाहिला. माझे नेहमी त्यांच्याशी आदराने वागलो, त्यांच्याशी माझे जवळचे आणि प्रेमळ संबंध होते. पण सुषमा स्वराज यांच्यासाठी त्यांनी वापरलेल्या अपमानास्पद भाषेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.


श्रद्धा वालकर हत्याप्रकरण : आफताबविरोधात चार्जशीट दाखल, आरोपीने केली नवीनच मागणी