घरदेश-विदेशभारत -बांगलादेश सीमेवरहीवाघा बॉर्डरसारखा थरार

भारत -बांगलादेश सीमेवरहीवाघा बॉर्डरसारखा थरार

Subscribe

भारत-बांगलादेश सीमेवर फ्लॅग रिट्रीटचा कार्यक्रम येत्या काही दिवसात अधिक दिमाखदार होणार आहे. इतिहासात पहिली वहिली अशी प्रेक्षक गॅलरी भारत सरकार या सीमेलगतच्या भागात विकसित करणार आहे. त्यामुळे अटारी वाघा बॉर्डरवर होणार्‍या फ्लॅग रिट्रीटच्या कार्यक्रमासारखाच राष्ट्रभक्तीच्या स्फुर्तीचा अनुभव याठिकाणीही येणार आहे. सीमा विकास प्रकल्पाअंतर्गत या प्रेक्षक गॅलरीचा विकास करण्याचा त्रिपुरा सरकारचा मानस आहे.

भारत-पाकिस्तानच्या अटारी वाघा बॉर्डवर दरदिवस होणारा जल्लोष हा भारत-बांगलादेशच्या सीमेवर होत नाही. पण त्रिपुरा राज्यातील पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने याठिकाणी सीमा भागाच्या विकासासाठी ५०० कोटी रूपयांचा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री बिल्पब कुमार देब यांनी सांगितले. त्रिपुरातील अगरतळा शहराची निवड ही स्मार्ट शहर म्हणून झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ५०० लोकांच्या क्षमतेची प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येणार आहे. छोट्या स्टेडिअमसारखीच या गॅलरीची रचना असेल. आता स्टेडिअमच्या स्लॅबचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. याठिकाणी पावसाळ्याचा कालावधी सात ते आठ महिने इतका असल्यानेच बांधकामासाठी अवघा चार महिन्यांचा प्रत्यक्ष कालावधी मिळणार आहे.

- Advertisement -

प्रेक्षक गॅलरीच्या ठिकाणीच कॅफेटेरियाची सुविधाही देण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी भारत-बांगलादेश सीमाभागात फ्लॅग रिट्रीटचा कार्यक्रम पाहणार्‍यांसाठी अल्पोपहाराची सुविधा होऊ शकेल. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या भागात बाऊंड्री वॉलदेखील करण्यात येणार आहे. शिवाय दोन्ही देशांच्या एंट्री पॉईंट्सच्या ठिकाणी गेट्सदेखील उभारण्यात येतील. शिवाय भारत-बांगलादेश दरम्यान पासपोर्टच्या आधारे ये जा करणार्‍या नागरिकांसाठी इमिग्रेशन पॉईंटही विकसित करण्यात येणार आहेत.

बांगलादेशात जाणार ट्रिटेड पाणी
भारतातून बांगलादेशात प्रवाहाने जाणार्‍या गटाराच्या पाण्याला वास येतो म्हणून बांगलादेशी नागरिकांनी याआधी आंदोलन केले होते. म्हणून भारत-बांगलादेश सीमा भागातच सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट बसवण्यात येणार आहे. या प्लॅन्टच्या माध्यमातून गटाराच्या दुर्गंधी येणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर हे पाणी पुढे सोडण्यात येणार आहे. एसटीपी प्लान्ट हादेखील अगरतळा स्मार्ट शहराचा एक भाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -