घरCORONA UPDATEकोरोना उपचारासाठीच्या आऊटडेटेड Antibiotics भारतासमोरील संकट वाढवणार

कोरोना उपचारासाठीच्या आऊटडेटेड Antibiotics भारतासमोरील संकट वाढवणार

Subscribe

जगभरात बंद झालेल्या अॅन्टीबायोटिक्सचा कोरोना रूग्णांवर वापर

कोरोना रूग्णांवर होणाऱ्या अॅन्टीबायोटिक्सचा अतिवापर हा येत्या दिवसांमध्ये भारतासमोरचे संकट आणखी वाढवू शकतो. जागतिक पातळीवर ज्या अॅन्टीबायोटिक्सचा वापर थांबला आहे, अशा अनेक औषधांचा वापर भारतात कोरोना रूग्णांवरील उपचारादरम्यान होत आहे. डॉक्टर रूग्णांच्या उपचारासाठी सध्या उपलब्ध आहेत, त्या सर्व औषधांचा वापर कोरोना रूग्णांसाठी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक रूग्णांच्या बाबतीत बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन निर्माण झाले. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात घातक अशा औषधाला प्रतिकार विषाणूंची निर्मिती यानिमित्ताने होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीचे संकट संपले तरीही औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या अॅन्टीबायोटिक्सचा प्रभाव कमी होणे हे येत्या काळातील मोठे संकट आहे.

जगभरात बंदी असलेल्या औषधांचा भारतात वापर

जगभरात अनेक देशांनी ज्या अॅन्टीबायोटिक्स औषधांवर बंदी घातली आहे, अशा औषधांचाही वापर भारतात होतो आहे, हीच भारतासाठी धोक्याची अशी घंटा आहे. तर अनेक हॉस्पिटलमध्ये एका रूग्णापासून दुसऱ्या रूग्णामध्ये वाढणारा संसर्ग हा भारतातील अनेक हॉस्पिटलमधील प्रकार दिसून आला आहे. अनेक औषधांच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार बजावल्यानंतरही मोठ्या प्रमाणात वापर होत राहिला. याचीच भर ही ड्रग रेजिस्टंटचे प्रकार वाढण्यामध्ये होऊ शकतो. अनेक रूग्णांना औषध लागू पडत नाही असेही प्रकार येत्या दिवसांमध्ये भारतात वाढू शकतो असा एक धोका या निमित्ताने वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

संशोधनातील निष्कर्ष

कोरोनाबाबत कोणतीही ठराविक अशी थेरपी वापरली नसल्यानेच दुसऱ्या प्रकारच्या संसर्गाचा धोका बळावू शकतो, यासाठी महत्वाचे कारण हे अॅन्टीबायोटिक्सच्या अतिवापर हेच असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मायक्रोबायोलॉजिस्ट कामीनी वालिया यांनी स्पष्ट केल्यानुसार अॅन्टीमायक्रोबायल रेजिस्टन्स लेव्हलची वाढ होण्यामध्ये अॅन्टीबायोटिक्सचा अतिवापर कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. जरनल इन्फेक्शन एण्ड ड्रग रेजिस्टन्समध्ये नुकताच याबाबतचा संशोधन प्रबंध प्रकाशित झाला आहे. या संशोधनाच्या निमित्ताने १७ हजार ५३४ रूग्णांचा दहा हॉस्पिटलमधील डेटा गोळा करण्यात आला. १ जून २०२० ते ३० जून २०२० या कालावधीतला डेटा गोळा करण्यात आला होता. यापैकी ६४० रूग्णांमध्ये म्हणजे ३.६ टक्के रूग्णांमध्ये सेकंडरी इन्फेक्शन आढळले. त्यामध्ये २८ टक्के रूग्णांमध्ये हॉस्पिटलमध्येच हा संसर्ग निर्माण झाला होता. यापैकी अर्ध्याहून अधिक रूग्णांमध्ये आढळलेला संसर्ग हा अनेक औषधांचा वापर झाल्याने आढळला. मल्टीड्रग रेजिस्टन्समुळे हे इन्फेक्शन आढळून आले होते.

कोरोनाच्या उपचारादरम्यान ज्या रूग्णांमध्ये सेकंडरी इन्फेक्शन आढळल्याने मृत्यू झाला, त्यापैकी ११ टक्के रूग्णांना दुसऱ्यांदा कोणत्याही आजाराची लागण झाली नव्हती, असे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये बहुतांश रूग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच आरोग्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच कोरोनाचा उपचार घेताना या रूग्णांची तब्येत नाजुक झाली होती. कोरोनामुळे मृत्यू होत नसून सेकंडरी इन्फेक्शनने मृत्यू होत असल्याचे मत, सेंटर फॉर डिझिज डायनामिक्स, इकोनॉमिक्स एण्ड पॉलिसी, नवी दिल्लीच्या रमनन लक्ष्मी नारायण यांनी मांडले आहे. या संस्थेमार्फत जगभरातील एन्टीबायोटिक रेजिस्टन्स पॅटर्न अभ्यासला जात आहे. कोरोनाच्या केसेस वाढलेल्या असताना हा डेटा गोळा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात अॅन्टीमायक्रोबायल्स अतिवापर झाल्यानेच हे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनाची देशात २ कोटी ७० लाख कोरोनाची प्रकरणे आढळली आहेत. त्यामध्ये गेल्याच महिन्यात १ कोटी प्रकरणे ही गेल्या महिन्याभरात आढळली आहेत. परिणामी हॉस्पिटलमध्ये वाढलेले रूग्ण आणि ऑक्सिजनचा तुटवडा यासारख्या समस्या आढळल्या आहेत.

- Advertisement -

विषाणू उपचारासाठी अवघड

औषधांच्या वाढत्या रेजिस्टन्समुळे Klebsiella pneumoniae, Acinetobacter baumannii यासारख्या विषाणूविरोधात औषधांची परिणामकता जाणवत नसल्याचे समोर आले आहे. अशा विषाणूचा संसर्ग हा उपचारासाठीही कठीण असल्याचे संशोधकांचे मत आहे. अनेक हॉस्पिटल्सने ब्लडस्ट्रीम इन्फेक्शनमध्येही अनेकपटीने वाढ झाल्याची माहिती दिली आहे. जून २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीत याप्रकारचे इन्फेक्शन वाढल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शरीरावर होणारा मोठ्या प्रमाणातला स्टेरॉईड्सचा वापरही शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. परिणामी इतर इन्फेक्शनला हे आयते आमंत्रण आहे. भारतात मोठ्या प्रमाणात होणारा स्टेरॉईड्सचा वापर हा येत्या महिन्यांमध्ये भारतासमोरील संकट आणखी वाढवणारा आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -