घरदेश-विदेशPM Modi Europe Visit : जर्मनीची मोठी घोषणा; भारताच्या हरित प्रकल्पांसाठी 2030...

PM Modi Europe Visit : जर्मनीची मोठी घोषणा; भारताच्या हरित प्रकल्पांसाठी 2030 पर्यंत 10 अब्ज युरोची देणार मदत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. मोदींनी सोमवारपासून आपल्या जर्मनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. सोमवारी जर्मनीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान जर्मनीने एक मोठी घोषणा केली आहे. जर्मनीने सांगितले की, भारताला हवामान बदलाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 2030 पर्यंत 10 अब्ज युरोची आर्थिक मदत देणार आहे. दोन्ही देशांमध्ये हा करार झाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. ग्रीन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट पार्टनरशिप (JDI) वरील संयुक्त घोषणा अंतर्गत ही मदत दिली जाईल.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, JDI भारत आणि जर्मनी यांच्यातील विकास सहकार्य अजेंड्याला दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टीकोन प्रदान करते. “मला वाटते की ही उद्दिष्टाची घोषणा आमच्या एकूण विकास सहकार्याच्या अजेंड्याला दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टीकोन प्रदान करते. 2030 पर्यंत नवीन आणि अतिरिक्त विकास सहाय्यासाठी 10 अब्ज युरोची वचनबद्धता जर्मनीने मान्य केली आहे.

- Advertisement -

परराष्ट्र सचिवांनी ग्रीन हायड्रोजन आणि नवीकरणीय उर्जेवरील सहकार्याबाबत दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी केलेल्या कराराबद्दलही बोलले. या क्षेत्रातील आमच्या भागीदारीचा एक भाग म्हणून, एक टास्क फोर्स जर्मनीच्या सहकार्याने भारतात ग्रीन हायड्रोजन हब स्थापन करण्याच्या दिशेने काम करेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर ओलाफ शुल्झ यांच्यातील चर्चेनंतर हे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. आज जर्मनी हरित आणि शाश्वत विकासासाठी इंडो-जर्मन भागीदारी सुरू करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या अंतर्गत जर्मनी 2030 पर्यंत भारताला 10 अब्ज युरो देणार आहे. यामुळे भारताला हरित विकास योजनांमध्ये मदत होईल.


Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -