रशियाच्या विजयोत्सवात भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग!

indian army

भारताने आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांना पहिल्यांदाच रशियातील मॉस्कोमध्ये पार पडणाऱ्या वर्षिक परेडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या परडेमध्ये केवळ लष्कराचा सहभाग होता. या परेडमध्ये लष्कर, हवाईदल आणि नौदलही सहभागी होणार आहे. २४ जूनला ही परेड पार पडेल. रशियाने या परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं होतं. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान त्या परेडमध्ये सहभागी होणार नाहीयेत. गेल्यावर्षी व्लादिवोस्तोकमध्ये झालेल्या भेटीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दरवर्षी ९ मेला रशिया आपला विजय दिवस साजरा करते. या निमित्ताने परेडचं आयोजन केलं जातं. परंतु कोरोनामुळे यावेळी त्याचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. १९४५ मध्ये नाझी जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आता भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे ७५ ते ८० जवान १९ जून रोजी या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.

७५ विजयी वर्ष

रशियाच्या विजयी दिवसाचं ७५ वं वर्ष असल्यानं रशियानं अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिलं होतं. याच वर्षी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी रशियाचे राजदूत निकोलय कुदेशीव यांची भेट घेतली होती. तसंच त्यांनी लडाखमधील भारत-चीन सीमेवरील तणावाची माहिती दिली होती. तर दुसरीकजे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असताना भारतानं अमेरिकेतून रवानगी करण्यात आलेल्या रशियाच्या दोन नेत्यांना भारतात येण्याची परवानगीही दिली होती.


हे ही वाचा – कोरोना नोव्हेंबरमध्ये गाठणार उच्चांक, आयसीएमआरच्या अभ्यासातील निष्कर्ष!