घरताज्या घडामोडीमोदी आणि बोरिस जॉनसन यांच्यात झाली बैठक, कोरोनासह 'या' मुद्दांवर झाली चर्चा

मोदी आणि बोरिस जॉनसन यांच्यात झाली बैठक, कोरोनासह ‘या’ मुद्दांवर झाली चर्चा

Subscribe

भारत ब्रिटन रोडमॅप २०३०च्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या आज (मंगळवार) संध्याकाळी एक व्हर्च्युअल बैठक आयोजित केली होती. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. मंत्रालयाने सांगितले की, या बैठकीद्वारे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. यावेळी संपर्क, वाणिज्य, सुरक्षा, जलवायु आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. वाणिज्य सहभाग वाढवण्याची घोषणा ही या बैठकीची प्रमुख कामगिरी आहे.

या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये कोरोना संदर्भात चर्चा झाली. जगात कोरोना व्हायरस हे एक मोठे आव्हान असल्याचे दोन्ही नेत्यांनी कबूल केले. या कोरोना संकटला सामोरे जाताना दोन्ही देश हातात हात घालून लढतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढाईत ब्रिटनची साथ असल्यामुळे बोरिस जॉनसन यांचे आभार मानले.

- Advertisement -

दरम्यान या बैठकीत एक रोडमॅप २०३० लाँच केला गेला, जो पुढील १० वर्षात भारत-ब्रिटन सहकार्य आणि व्यापार मजबूत करण्यासाठी मदत करेल. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचे म्हणणे आहे की, भारत जगातली सर्वात मोठा बाजार आहे. या बैठकीपूर्वीच त्यांनी १ अब्ज पौंड (सुमारे १० हजार कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारातील नवीन संधी आणि भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार याबद्दल चर्चा झाली.

या बैठकीत संरक्षण उपकरणांचे सह-उत्पादन आणि सह-विकास यावर चर्चा झाली. दोन्ही देशांनी या क्षेत्रात एकमेकांना मदत करण्यासाचा विश्वास दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, या व्यापार आणि गुंतवणूकीमुळे ब्रिटनमध्ये ६ हजार ५०० हून अधिक रोजगार मिळतील. या पॅकेजमध्ये ब्रिटनमध्ये ५३.३ कोटी पौंड नवीन भारती गुंतवणूकीचा समावेश आहे. यामुळे आरोग्य आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात ६ हजारांहून अधिक रोजगार निर्मितीची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर RT-PCR चाचणी करणे आवश्यक नाही, ICMRच्या नव्या गाईडलाईन्स


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -