Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाच्या लढाईत अश्वगंधा किती फायदेशीर? भारत ब्रिटनसोबत करणार अभ्यास

कोरोनाच्या लढाईत अश्वगंधा किती फायदेशीर? भारत ब्रिटनसोबत करणार अभ्यास

Related Story

- Advertisement -

भारतीय संशोधक कोरोनातून बरे होण्यासाठी अश्वगंधा किती फायदेशीर आहे, याचं संशोधन करणार आहेत. यासाठी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन, यूके या संस्थेची मदत घेणार आहेत. आयुष मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. यामध्ये ब्रिटनमधील लेस्टर, बर्मिंघम आणि लंडन या तीन शहरातील दोन हजार लोकांवर अश्वगंधाची चाचणी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात दोन्ही संस्थांमध्ये करार झाला आहे. अश्वगंधा ही एक पारंपरिक भारतीय औषधी वनस्पती आहे जी ऊर्जा वाढवते, ताण कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

कोरोना दरम्यान अश्वगंधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणे ही एक मोठा विजय ठरू शकतो आणि भारताच्या पारंपारिक औषधी प्रणालीला वैज्ञानिक वैधता देऊ शकतात. विविध आजारांमध्ये या औषधी वनस्पतीचे फायदे समजून घेण्यासाठी अश्वगंधावर अनेक अभ्यास झाले आहेत, परंतु मंत्रालयाने कोविड -१९ रुग्णांवर तिचा प्रभाव तपासण्यासाठी परदेशी संस्थेसोबत करार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisement -

एलएसएचटीएमचे डॉ संजय किनरा हे या अभ्यासाचे मुख्य अन्वेषक आहेत. या चाचणीमध्ये सहभागी झालेल्यांनी दिवसातून दोनदा ५०० मिलीग्राम गोळ्या घेणं आवश्यक आहे. या अभ्यासात एक महिना पाठपुरावा केला जाईल. दैनंदिन जीवनाचे रेकॉर्डिंग उपक्रम, मानसिक आणि शारीरिक आरोग्य लक्षणं, पूरक वापर आणि प्रतिकूल घटनांचा समावेश असेल. नेसरी म्हणाले, ‘तीन महिन्यांसाठी १००० सहभागींच्या एका गटाला अश्वगंधा (एजी) टॅब्लेट दिले जातील, तर १००० सहभागींच्या दुसऱ्या गटाला प्लेसबो दिला जाईल, जो एजीसारखा दिसणार असेल आणि चव देखील सारखी असेल.

 

- Advertisement -