घरदेश-विदेशभारत-अमेरिकेतील संबंध आणखी दृढ होणार, व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांचा दावा

भारत-अमेरिकेतील संबंध आणखी दृढ होणार, व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांचा दावा

Subscribe

बायडर प्रशासन भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असं जॉन फायनर यांनी म्हटलंय. 2022 आणि 2023 ही वर्षं भारत आणि अमेरिकाच्या संबंधाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत, असंही ते म्हणाले. 

वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिकेतील (India America Relation) संबंध आता आणखी दृढ होणार आहेत. २०२३ मध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक जवळचे होती, अशी आशा व्हाईट हाऊसचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. २०२२ मध्ये रणनितीच्या स्वरुपात भारत आणि अमेरिका जवळ आले होते. पुढील वर्ष यापेक्षा जास्त चांगले ठरेल, असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतेच कौतुक केले होते. त्यातच, हा दोन्ही देशांमधील नात्यांसंबधी हा खुलासा समोर आला आहे.

हेही वाचा Shraddha Murder Case: मोठा खुलासा! डोकं आणि धड तब्बल सहा महिने ठेवले होते फ्रिजमध्ये

- Advertisement -

बाली येथे संपन्न झालेल्या जी २० शिखर संमेलनात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत व्हाईट हाऊसचे उप राष्ट्रीय सल्लागार जॉन फायनर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. जी २० च्या बाली शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील युद्धाबाबत सांगितलं की युद्ध हे कोणत्याही समस्येवरचं उत्तर नाही. मोदींच्या या भूमिकेमुळे अनेक देश भारतापासून चांगल्या संबंधाची अपेक्षा ठेवत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, जी २० चं पुढील वर्षीचं अध्यक्षपद भारताकडे असल्याने जागतिक पातळीवर समस्यांवर तोडगा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

हेही वाचा – ट्विटर, मेटा, अॅमेझॉननंतर सिस्को आणि झोमॅटोमध्येही होणार कर्मचारी कपात

- Advertisement -

बायडर प्रशासन भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असं जॉन फायनर यांनी म्हटलंय. 2022 आणि 2023 ही वर्षं भारत आणि अमेरिकाच्या संबंधाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -