घरक्रीडाभारताने जिंकलेली २०११ ची वर्ल्डकप फायनल फिक्स्ड होती, श्रीलंकन माजी मंत्र्याचा दावा!

भारताने जिंकलेली २०११ ची वर्ल्डकप फायनल फिक्स्ड होती, श्रीलंकन माजी मंत्र्याचा दावा!

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित

श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. न्यूज फर्स्टच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री म्हणाले की, २०११ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील विश्वचषक अंतिम सामना हा फिक्स्ड होता. दरम्यान या सामन्यात भारताने श्रीलंकेला सहा गडी राखून पराभूत करून २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला होता.

महिंदानंद अलुथगमगे म्हणाले की, ‘मी यात क्रिकेटपटूंचा समावेश करणार नाही. तर, काही समूह या निश्चितपणे फिक्सिंगमध्ये सहभागी होते. माजी क्रीडामंत्री म्हणाले की, आपल्या देशाची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवून अधिक कोणतेच खुलासे करायचे नाहीत. श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांनी या दाव्याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध करुन दिला नसला तरी श्रीलंकेच्या संघाने हा सामना जिंकता आला असता, असेही त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

तीन वर्षांपूर्वी असाच दावा श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनीही केला होता. २०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेचे काय झाले याची चौकशी झाली पाहिजे, असे अर्जुन रणतुंगा म्हणाले होते. यावेळी रणतुंगा म्हणाले होते की, ‘मी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात कमेंटरी पॅनेलमध्ये होतो. श्रीलंकेची कामगिरी पाहून मी खूप निराश होतो. त्यादिवशी काय घडले हे मी सांगू शकत नाही, परंतु मी कधीतरी सत्य घेऊन बाहेर येईल. माझा विश्वास आहे की, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

२०११ च्या विश्वचषकात संगकारा श्रीलंका संघाचा कर्णधार होता. विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना यजमान भारतासमोर २७४ धावांचे लक्ष्य समोर ठेवले होते. सलामीवीर गौतम गंभीर (९७) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ९१) यांच्या मदतीने भारताने हे लक्ष्य साध्य केले.


हेही वाचा – सात वर्षांच्या बंदीनंतर श्रीशांत पुनरागमन करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -